'Defence is defeat. Attack is the best form of
Defence.’
सध्या
रायडींग क्षेत्रात महिलांचा उत्स्फूर्त
सहभाग हा लक्षवेधी
आहे. रायडिंगच्या पूर्ण
गणवेशात त्या जणू
रणरागिणीच भासतात. समाजातील काही
चुकीच्या परंपरांनी ग्रस्त लोकांनी
माथी मारलेल्या तथाकथित
दुबळेपणाचा बुरखा फाडून या
रणरागिनिंनी "राणी लक्ष्मीबाई",
"राणी चेन्नमा " यांची आठवण करून
देतात. फार कौतुक वाटते. बऱ्याचजणी तर
दीर्घ बाइक रायीड देखील करतात. भारतातील विविध भागातून रायीड करताना विशेष सुरक्षा
बाळगावी लागते. अशावेळी या स्त्रियांना खऱ्या अर्थाने तयार व्हावे लागणार. नुसती बाइक
चालवता आली कि झाले असे नव्हे, स्वसंरक्षणाचेही धडेही या स्त्रियांनी घेतले पाहिजे.

सध्याचे
आपल्या प्रंतप्रधानांनी ६ मार्च
रोजी ट्विटर वरून
याचा आवर्जून उल्लेख
केलेल्या. २००७ रोजी
चेन्नई येथील मदर टेरेसा
विद्यापीठाच्या १७ व्या
दीक्षांत समारोहाच्या दिनी तत्कालीन
राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील
यांचे भाषणातील बोल
आठवले. "imparting physical education - like Judo,
Karate - for self-defence to girl students from a very early age so as to make
them physically strong and to build-up their confidence. Self-defence is the
best defence."
इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते. आमच्यात लग्नानंतर नवविवाहित जोडपे देव दर्शनाला जातात, याला मी आणि वर्षा अपवाद नव्हतो. २००६ साली (लग्नानंतर) आम्ही देखील मुंबादेवी मंदिरात गेलो होतो. मुंबादेवी हा मुंबईतील गजबलेल्या वस्तींपैकी एक भाग. येथे सकाळी १० वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत भरपूर गर्दी असते. अशा प्रचंड गर्दीतून मुंबादेवी मंदिराच्या दिशेने मी आणि वर्षा वाट काढत पुढे जात होतो. लग्नानंतरचा दुसरा दिवसच असल्याने वर्षाने आपले दागिने घातले होते. गर्दीतून अचानक एका व्यक्तीच्या जोर जोरात ओरडण्याचा आवाज येऊ लागला, त्या ओरडण्याच्या आवाजाने तेथील माणसांच्या वर्दळीचा रोख थांबला. मी ही त्या आवाजाकडे मागे वळून बघितले तर माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता, वर्षाने एका माणसाचा हात इतक्या जोरात पिळवटला होता की तो माणूस रस्त्यावर अक्षरश: हतबल होऊन खाली बसला होता. तिने एका हाताने त्याचा हात पिळवटून दुसऱ्या हाताने सटासट कानाखाली वाजवत होती. २५ वय आणि साधारणत: ४५ किलोच्या आसपास असणाऱ्या वर्षाने त्या माणसाला अक्षरश: लोळवल होत. गर्दीचा फायदा घेऊन तिचे मंगळसूत्र चोरण्याचा त्याचा प्रयास पुरता फसला होता. त्या चोराला पोलिसांच्या ताब्यात देऊन. आम्ही मार्गस्थ झालो आम्ही देवीचे दर्शन घेतले व मरीन ड्राईव्हच्या समुद्राजवळ थोडावेळ घालवायचा ठरविले. तीच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता दिसत होती, जणू काही घडलेच नाही अशा आविर्भावात ती वावरत होती. देवीच्या ओटीमधला प्रसाद तीने मला दिला, नुकताच तिचा नवा अवतार पाहून मीही तीला नमस्कार केला व पटकन पेढा तोंडात टाकला. त्यासरशी ती जी हसली हे पाहून मी एका नॉर्मल मुलीशीच लग्न केल्याची जाणीव मला झाली आणि जीव भांड्यात पडला. विनोदाचा भाग वगळता मला आज तिचा सार्थ अभिमान वाटत होता. त्या गर्दीत जर ती गाफील राहिली असती किंवा घाबरून गेली असती किंवा संकटात आपल्याला कोणी (मी) वाचवायला येईल असा विचार करीत राहिली असती तर ती आपले मंगळसूत्र चोराच्या हाती सोपवून एखाद्या अगतिक स्त्रीप्रमाणे रडत बसली असती. नुकत्याच झालेल्या लग्नाला लांच्छन लावणाऱ्या प्रकाराला तिनी मोठ्या जिगरीने लढा दिलेला होता.
ती
स्वतःहून बोलत होती:
“स्त्री जन्मा ही
तुझी कहाणी, हृदयी
अमृत, नयनी पाणी” हि आपल्या स्त्रीची मूळ अवस्था… तिची कहाणीच वेगळी … अगदी प्रत्येकीची… अश्रू जणू तिचा एक अलंकारच होऊन बसला आहे.. जर आज
मी Dr. अनिरुद्ध धैर्यधर जोशी
यांच्या १३ कलमी
योजनेपैकी अहिल्यासंघाचा भाग नसते,
तर परिस्थिती वेगळी
असती. त्यांनी सांगितले
होते "Do not wait for Ram to come. Ahilya must take
charge and do things herself. स्त्रियांमध्ये शक्तीचा एक विलक्षण
असा साठा जन्मजातच
असतो. दुर्गेचे रूप
असणाऱ्या स्त्रीला आज
खरी गरज आहे
ती तिच्यातील अमर्याद
शक्तीला जागे करण्याची.
तुम्ही विचार कराल की,
तुमचा नवरा, तुमची
मुले, तुमचा भाऊ,
तुमचा समाज तुम्हाला
वाचवायला येईल, तर तस
नाही आहे. द्रौपादिसोबत
तिचे पाच जीवनसाथी
होते, सासरे होते,
कोणीही पुढे आले
नाहीत. देव तुमची
नक्की मदत करणार
पण तुम्हाला स्वतःहून
सबळ होण्यासाठी मेहनत
घ्यायची आहे". अहिल्यासंघातून सगळ्या
भारतीय प्राच्य विद्या त्यांनी
आम्हाला आत्मसात करू दिल्या
जेणेकरून आज मी
स्वाभिमानाने सांगते की " I am Proud to be part of अहिल्यासंघ".

ओंकार... खूप सुंदर लेख. काळाबरोबर अहिल्यासंघ शिकून स्वतःची मोठ्या गर्दीत सौभाग्यलंकार सांभाळणा-या तुमच्या पत्नीचे खूप कौतुक. आणि अहिल्यासंघाची मुहुर्तमेढ रोवणा-या डॉ. अनिरुद्धांना माझा मन:पुर्वक नमस्कार..
ReplyDeleteधन्यवाद.
AMBADNYA
ReplyDeleteAMBADNYA
ReplyDeleteआज प्रत्येक वीराने अहिल्या संघामार्फत दिले जाणारे प्रशिक्षण घेतलेच पाहिजे ही काळाची गरज आहे
ReplyDeleteआज प्रत्येक वीराने अहिल्या संघामार्फत दिले जाणारे प्रशिक्षण घेतलेच पाहिजे ही काळाची गरज आहे
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteVery nice and motivating!
ReplyDeleteओंकार खूप छान लेख. आपल्या पत्नीने "अहिल्या संघाच्या " प्रशिक्षणाचा उचित वेळी उचित प्रयोग करून आपल्या सौभाग्यालंकाराचे स्वत:च रक्षण केले ही खरोखरीच कौतुकास्पद गोष्ट आहे जी सिध्द करते की वेळ प्रसंगी स्त्री ही सबला बनून तिच्याच आदिमातेचे महिषासुरमर्दिनी रूप धारण करून स्वसमर्थ, सक्षम बनू शकते. अहिल्यासंघाचा श्रीगणेशा करून स्त्रियांना सबल, सक्षम आणि स्वसंरक्षणासाठी प्रेरीत करणार्या डॉक्टर अनिरूध्द जोशींना मानाचा मुजरा !!!
ReplyDeleteApratèem lihile aahe.
ReplyDeleteApratèem lihile aahe.
ReplyDeleteApratèem lihile aahe.
ReplyDeleteApratèem lihile aahe.
ReplyDelete