माझे श्रद्धास्थान

श्री अनिरुद्ध धैर्यधर जोशी (MD-Rhumatology )
मला नक्की तारीख नाही सांगता येणार, परंतु डिसेंबर २००० रोजी (कदाचित).  

मी नकळत अगदी शेवटचा आधार म्हणून दादर येथील अण्टोनिया डिसिल्व्हा हायस्कूल येथे गुरुवारी होणाऱ्या प्रवचनाला गेलो. ती प्रथम भेट शब्दात वर्णन करता येणारच नाही. पहिल्याच दर्शनी बापू माझेच आहेत आणि मी त्यांचा हे नात दृढ झाले. आणि आजतागायत आमचे सर्व कुटुंब आमचा एकमेव आधार हे बापूच आहे या सरळ सोप्या पण महत्त्वाच्या सूत्राने जीवन जगत आहोत. खरंच माझे बापू आहेच तसे. कोणीही कितीही घ्यावा कधीही न संपणारा अमर्याद प्रेम सागर. 

बापू सगळ्या मानवी मर्यादा सांभाळून, सगळे, अगदी सगळे छान कसं करू शकतात, याचा विचार करून मी नेहमी थक्क होतो. Live by Example या विचारसरणीचा आहे माझे बापू. नेहमीच माझ्या उत्कर्ष्याचा विचार करणारे, माझी काळजी घेणारे माझ्या प्रत्येक यशाचे भरभरून कौतुक करणारे एक प्रेमळ पिता, माझा बाप, माझा अनिरुद्ध. त्यांच्या प्रत्येक बाळाची ते जबाबदारी सहज आणि सर्वसामर्थ्यानिशी घेतोच घेतातच.

जीवनातल्या प्रत्येक पाऊलावर माझ्यासोबत सदैव माझी साथ देणारे, मला योग्य मार्गदर्शन करणारा माझा बापू.  बापू कोणत्याही विषयावर अगदी सहज बोलतात आणि तेही वरवरचे नव्हे तर अगदी सखोल मार्गदर्शन. त्यांनी जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन मला दिला. आहे त्या परिस्थितीचा योग्य तो वापर करून अपेक्षित रिजल्ट कसा करायचा हे बापू सुंदर समजावून सांगतात. 

बापू नेहमी म्हणतात "मी एक योद्धा आहे, व ज्याला कुणाला युद्धकला शिकायची असेल त्याला युद्धकला शिकवणे हा माझा छंद आहे". 

4 comments:

  1. Ho... nakkich... Yuddha majha Ram Karnar... Mi fakt tyacha vanarsainik banne avashyak aahe... mag apan apsuk pane tyachya chatra chaye khali sukhat nivant jagto... 'Na Ladhta vijay prapt hot rahto...'

    Ambadnya

    ReplyDelete
  2. श्रीगुरुसारिखा असतां पाठीराखा । इतरांचा लेखा कोण करी ॥१॥
    राजयाची कांता काय भीक मागे । मनाचियां जोगे सिद्धी पावे ॥२॥
    कल्पतरु तळवटीं जो कोणी बैसला । काय वाणी त्याला सांगिजो जी ॥३॥
    ज्ञानदेव म्हणे तरलों तरलों । आतां उद्धरिलों गुरुकृपे ॥४॥
    ओंकार तुमच्या सदगुरु श्रीअनिरुध्दांवरचे तुमचे प्रेम आणि तुमची श्रध्दा , विश्वास पाहून साक्षात ज्ञानोबामाऊलीचे मुखीचे बोल आठवले. सदगुरु हा खरोखरी कारूण्याचा दयाघन असतो , जो आपल्या लेकरांचे लाड आईच्या मायेने पुरवितो ह्याची प्रचिती आली.

    ReplyDelete