Saturday 9 January 2016

माझी वॉरहॉर्स


जून २०१२ रोजी एका मित्र सोबत मी शिर्डी येथे पहिल्यांदा माझी इलेक्ट्रा घेऊन गेलो. पुढे मी आणि warhorse दोघांनी जवळपास १४ राज्य (जम्मू काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतअवघ्या  वर्ष्यात पूर्ण केलीतराईड मोजणे मी सोडूनच दिले

रायडींग आणि अध्यात्म

माझ्या मते रायडींग आणि अध्यात्म वेगळे नाहिचभक्ती मार्गात जशी तल्लीनताध्यासप्रेमएकाग्रता गरजेची आहेरायडींगच्याबाबातीतही  ह्या गोष्टी महत्वाच्या आहेतभक्तीमध्ये अहंकार कामी येत नाहीतसेच रायडींगमध्येहीभक्ती करताना लागत त्याप्रमाणेच रायडींग करत असतानासुद्धा मन,बुद्धी आणि देह ह्या तीनही गोष्टी एकरूप व्हाव्या लागतात
मला बाइक्सची दोन्ही चाके ही श्रद्धा आणि सबुरीची वाटतात. कारण अध्यात्म असो किंवा व्यवहार किंवा मग माझी रायडींग असो..श्रद्धा आणि सबुरीची चाके महत्त्वाची असतात. त्याशिवाय माझी जीवनाची गाडी चालूच शकत नाही.



माझा देश: माझा ध्यास


भारताबद्दल लिहावे तितके कमीच.
भारतमातेचे वर्णन असे-समुद्र जिचा चरणाभिषेक करितो, जिच्या माथ्यावर गिरीराज हिमालयाचा मुकुट आहे, जी हरित वस्त्राने  नटलेली आहे. अनेक पवित्र नद्यांनी तिचा अभिषेक होतो ती या जगताची स्वामिनी आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारतची नैसर्गिक सुसंप्न्न्ता काही वेगळीच. 

उत्तर दक्षिण पसरलेल्या पर्वतरांगा जणू या भारताच्या पाठीचा कणाच, जैवविविधातेतून नटलेल्या या पर्वतरांगातून उतरणाऱ्या घाटवाटा म्हणजे जणू या भारताचे स्नायूच आहेत. 

येथे बर्फाच्छादित पर्वतरांगा आहेत, वाळवंट आहेत, नद्या आहेत. पर्वतराजीतून वाहणारे, फेसाळणारे धबधबे आहेत, अति घनदाट अरण्ये आहेत, सुंदर समुद्रकिनारे आहेत, इथली ऐतिहासिक वास्तूं, इथली मंदिरे अगदी विलोभनीय. जशी विविधता निसर्गाची तशीच लोकांची देखील. 

भारताबद्दल वरील नमूद केलेल्या गोष्टी मला स्वस्थ बसूच देईना. मग एक नवीन ध्यास मला लागला भारत  अनुभवण्याचा आणि तोही बुलेटवर. 

त्याबद्दल मला माझ्या पत्नीने (वर्षा)पूर्ण पाठींबा दिला. माझे नातेवाईक तिला नेहमी विचारतात कि तुला भीती नाही वाटत का? तुला दोन लहान मुले आहेत, तू कशी काय याला या गोष्टीची परवानगी दिलीस.

त्यावर ती सहजच हसून उत्तर देते कि “मी स्वतःला वाहन समजते व अनिरुद्धाला त्याचा वाहक. माझ्या गाडीचे स्टेअरिंग त्याच्या हातात दिले असता मी जास्त विचार का करवा. माझ्या जीवनातील प्रत्येक गोष्ट हि फक्त त्याचीच इच्छा आहे. आमच्या आयुष्याचा खरा पाठीराखा आमचा सद्गुरु श्री अनिरुद्धच आहे व मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे”. कदाचित आमचे नातेवाईक तिला मूर्ख समजत असतील पण तिला ते मान्य आहे.

नातेवाईक, मित्र मंडळी सर्वजण प्रेमापोटीच बोलतात याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे, आणि त्याबद्दल आम्हाला त्यासर्वांचा आदरही आहे.