Saturday, 9 January 2016

माझा देश: माझा ध्यास


भारताबद्दल लिहावे तितके कमीच.
भारतमातेचे वर्णन असे-समुद्र जिचा चरणाभिषेक करितो, जिच्या माथ्यावर गिरीराज हिमालयाचा मुकुट आहे, जी हरित वस्त्राने  नटलेली आहे. अनेक पवित्र नद्यांनी तिचा अभिषेक होतो ती या जगताची स्वामिनी आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारतची नैसर्गिक सुसंप्न्न्ता काही वेगळीच. 

उत्तर दक्षिण पसरलेल्या पर्वतरांगा जणू या भारताच्या पाठीचा कणाच, जैवविविधातेतून नटलेल्या या पर्वतरांगातून उतरणाऱ्या घाटवाटा म्हणजे जणू या भारताचे स्नायूच आहेत. 

येथे बर्फाच्छादित पर्वतरांगा आहेत, वाळवंट आहेत, नद्या आहेत. पर्वतराजीतून वाहणारे, फेसाळणारे धबधबे आहेत, अति घनदाट अरण्ये आहेत, सुंदर समुद्रकिनारे आहेत, इथली ऐतिहासिक वास्तूं, इथली मंदिरे अगदी विलोभनीय. जशी विविधता निसर्गाची तशीच लोकांची देखील. 

भारताबद्दल वरील नमूद केलेल्या गोष्टी मला स्वस्थ बसूच देईना. मग एक नवीन ध्यास मला लागला भारत  अनुभवण्याचा आणि तोही बुलेटवर. 

त्याबद्दल मला माझ्या पत्नीने (वर्षा)पूर्ण पाठींबा दिला. माझे नातेवाईक तिला नेहमी विचारतात कि तुला भीती नाही वाटत का? तुला दोन लहान मुले आहेत, तू कशी काय याला या गोष्टीची परवानगी दिलीस.

त्यावर ती सहजच हसून उत्तर देते कि “मी स्वतःला वाहन समजते व अनिरुद्धाला त्याचा वाहक. माझ्या गाडीचे स्टेअरिंग त्याच्या हातात दिले असता मी जास्त विचार का करवा. माझ्या जीवनातील प्रत्येक गोष्ट हि फक्त त्याचीच इच्छा आहे. आमच्या आयुष्याचा खरा पाठीराखा आमचा सद्गुरु श्री अनिरुद्धच आहे व मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे”. कदाचित आमचे नातेवाईक तिला मूर्ख समजत असतील पण तिला ते मान्य आहे.

नातेवाईक, मित्र मंडळी सर्वजण प्रेमापोटीच बोलतात याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे, आणि त्याबद्दल आम्हाला त्यासर्वांचा आदरही आहे. 

2 comments:

  1. Wow... Patni hi Kharya arthane kashi aplya patis sahayya ani utsah vardhak aste... ani ticha tujhyavar, ani tya hi peksha aplya sadgurun var asleli shraddha prem ani vishwas ha jari vakhannya sarkha asla... tari rya hi peksha jast vandaneey bhaav ahe ticha...

    'Aniruddha Jya gadicha Chalak - Te vaahan Bighadnar nahich... ya ulat... ti suvyavasthit margakraman karit agresar rahnar' yat shanka nahi...

    Varshaveera ani tula - Doghana hi manah:purvak Ambadnya... :-)

    ReplyDelete
  2. ओंकार आपल्या भारतमातेची थोरवी गावी तेवढी कमीच . तुमच्या ह्या अद्भुत प्रवासासाठी अनंत, अनिरूध्द शुभेच्छा!!!
    खरेच तुमचा आणि तुमच्या पत्नीचा तुमच्या सदगुरुंच्या चरणीचा विश्वास खरोखरीच कौतुकास्पद आणि वाखाणण्याजोगा आहे. गुरुचरित्रात १४व्या अध्यायात एक ओवी येते की ज्याचे हृदयी श्रीगुरुस्मरण। त्यासे कैंचे भय दारूण । काळमृत्यु न बाधे जाण । अपमृत्यु काय करी ।। तुम्ही पती-पत्नी व्यावहारिक आयुष्यात हेच अध्यात्म आचरणात आणता हे वाचून खूप आनंद झाला.

    ReplyDelete