Wednesday 28 June 2017

वाङमयीन यात्रा

आजवर भारतभर बुलेटने प्रवास करताना अनेक जुन्या नवीन गोष्टी ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडत आलो. पण आजची माझी ब्लॉगयात्रा ही थोडीशी आडमार्गाला जाऊन एका सुंदर वळणावर विसावते. दि. २६//२०१७ माझ्या जीवनातील एक अविस्मरणीय संध्याकाळ ठरली. कारण ही तसेच होते. लोटस पब्लिकेशन प्रा. लि . ने आयोजित केलेला पुस्तक प्रकाशन सोहळा .आजच्या डिजीटल युगात एकीकडे जिथे उथळ वाचकवर्ग बहुतांश किंडल , व्हाट्सएप , फेसबुक या मांदियाळीत चैन करीत असताना, दुसरीकडे सुजाण, विवेकी वाचक वर्ग, चांगलं, बुद्धीला आणि मनाला प्रेरणा देणाऱ्या साहित्याच्या शोधात भटकत आहेत ह्याची फार मोठी खंत जाणवते. नवी पिढी तर दृकश्राव्यात इतकी बुडाली आहे की वाचन आणि त्याआधारे कल्पना करून त्या स्थितीचे चित्र डोळ्यासमोर आणून त्याची जाणीव करणे ह्या क्रियाशीलतेकडे पाठ फिरवीत आहेत . काही अपवाद आहेत पण फारच कमी

वाचन संस्कृतीची उत्पत्ती म्हणजे सक्षम, सुजाण  व्यक्तिमत्त्व आणि पर्यायाने भक्कम समाज. उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा पायाच मुळी सकस वाचनाचा आहे . पण आज हल्ली चांगले साहित्य आम्हा वाचकांच्या समोर मांडते तरी कोण ? आणि मांडले तर त्याला योग्य ते सादरीकरण आणि उचित मार्गदर्शनाची जोड देणारी पब्लिकेशन तरी किती? पण ह्या सर्व चिंताग्रस्त प्रश्नांना तडा देत वाचक आणि मुखत्त्वे चांगल्या लेखकांच्या मदतीला लोटस पब्लिकेशन उभे ठाकले आहे. वाचन आणि लेखन संस्कृती वर्ग लयास जात असल्याच्या बाष्कळ गप्पा नव्हे तर मोठमोठी वादळे घडवून मग ती वादळे पेल्यात रिचविण्यात अनेकजण धन्यता मानतात. अशावेळी आजच्या डिजिटल अभिमुख युगात वाचकांच्या भेटीला दोन अनमोल पुस्तके आणून लोटस पब्लिकेशन ने साहित्य क्षेत्राकरिता असलेले त्यांचे ध्येय सिद्ध केले.   



या पब्लिकेशनचा पायाच मुळी एका ठाम ध्येयावर आधारित आहे, तो म्हणजे समर्थ भारत घडविण्यासाठी गरज असलेल्या सुदृढ लोकशाही आणि त्याकरिता सुशिक्षित, बुद्धिमान मध्यमवर्गावर सांस्कृतिक सावधपणाचे संस्कार करणे. "सांस्कृतिक सावधपणा" ह्याची असलेली गरज आजवर किती जणांनी ओळखली? आणि जरी ओळखली तर किती जण त्यासाठी कार्यरत झाले. पण इथेच लोटस पब्लिकेशनची वेगळी आणि विशेष बाब लक्षात येते.  
एकीकडे आशालता ताई वाबगावकरांचे "गर्द सभोवतीहे मानवी संवेदनांना साद घालणारे पुस्तक.

तर त्याचवेळेला डॉवसुधा आपटे यांचे "गुन्हेगारांचे कर्दनकाळ न्यायवैद्यक शास्त्रहे न्यायवैद्यक शास्त्रातील ८६ विविध विषयांचा गोषवारा शास्त्रीय पद्धतीने अतिशय रोचक पद्धतीने वाचकांसमोर आणणारे पुस्तक.


























कार्यक्रमाचे स्थळ देखील तितकेच सांस्कृतिक कलेचा वारसा लाभलेले राजा शिवाजी विद्यासंकुलाचे "प्राचार्य बी. एन .वैद्य सभागृह ". कार्यक्रमाला पोहचल्यावर प्रामुख्याने आढळलं ते काही तेजस्वी तरुण मंडळी लोटस पब्लिकेशनचे ओळखपत्र लावून सभागृहात प्रत्येकाशी सविनय वागताना दिसत होती . एखाद्या घरगुती समारंभाला देखील लाजवेल इतकं वैयक्तिक लक्ष प्रत्येक रसिक मान्यवरांना ही मंडळी देत होती. आवर्जून चहा-कॉफीचा आग्रह करीत होती. पुस्तक प्रकाशनचा सोहळा असा देखील असतो यावर विश्वास पटत नव्हता. एरव्ही प्रमुख पाहुण्यांव्यतिरिक्त वैयक्तिक लक्ष आणि सन्मानपूर्वक वागणूक प्रेक्षकांना कदाचित मिळत असेल .म्हणूनच कार्यक्रमात उच्चारलेले "रसिक मान्यवर" हे वाक्य वरवरचे नसून अगदी अंतःकरणापासून होते.


ह्यातून एक सारखं जाणवत होते ते म्हणजे या तरुणांची लोटस पब्लिकेशनच्या प्रति असलेली बांधिलकी आणि त्यांच्यावर पब्लिकेशनचे असलेले संस्कार. एकावेळीच दोन पुस्तकांचे प्रकाशन असूनसुद्धा कुठेही कसलीही गडबड, घाई, गोंधळ जाणवत नव्हता. किंबहुना सनईच्या सुरांनी अख्ख सभागृह मंत्रमुग्ध झालं होते. संपूर्ण कार्यक्रमाला एक दिशा होती आणि त्या दिशेचा संथ प्रवाह वेळोवेळी इंद्रायणी नदीच्या तीरावर निवांत बसण्याची अनुभूती देत होताकार्यक्रमाची मांडणीच इतकी सुरेख आणि सुबक होती की आयोजकांनी वेळेचा चांगलाच सदुपयोग केलेला दिसून येत होता. त्यामुळे कार्यक्रम कुठेच रटाळवाणा वाटत नव्हता. आशालताताई आणि डॉ वसुधा आपटे यांच्या मनोगतातून लोटस पब्लिकेशन ने पुस्तक प्रकाशनासाठी केलेल्या अनन्य साधारण योगदानाची प्रचिती येत होती. या सगळ्यावरून एकंदरीत लोटस पब्लिकेशनचा आवाका लक्षात येतो.  

मानवाच्या शोधबुद्धीचा आत्मप्रकाशाचा वेग सूर्यप्रकाशाला देखील मागे टाकू शकतो. हे जाणून लोटस पब्लिकेशन ने बारा वर्षांपूर्वी "दैनिक प्रत्यक्ष" हा एक वेगळा प्रयोग वाचकांसमोर मांडला


या दैनिकाने बिगर राजकीय अशी स्वतःची वेगळी ओळख करून दिली. देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडींचा वेध घेणाऱ्या बातम्या या दैनिकात आहेत. वास्तवाचं भान करून देणाऱ्या अनेक उत्कृष्ट लेखमाला वाचकांसमोर मांडल्या. यातील सर्वात महत्त्वाची ठरलेली लेखांची मालिका म्हणजे "तिसरे महायुद्ध ". दैनिक प्रत्यक्ष चे कार्यकारी संपादक डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी यांच्या लेखणीतून साकारलेली "तिसरे महायुद्ध " ही लेखमाला पुष्कळ गाजली. याच्या तीन आवृत्त्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांतून लोटस पब्लिकेशनने देशभरातील वाचकांना उपलब्ध करून दिल्या आहेत


चालता बोलता इतिहास या सदरातून झेप घेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील पुस्तकही लोटस पब्लिकेशनने वाचकांसाठी मराठी, हिंदी, गुजराती आणि इंग्रजी अशा चार भाषांतून एकाच वेळी प्रकाशित केले.




याशिवाय चालता बोलता इतिहास या सदराला अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वाच्या लेखणीने समृद्ध केले. स्वतःचे कर्तृत्त्व, त्यांचे विचार त्यांच्याच शब्दात मांडण्यासाठी लोटस पब्लिकेशनने अनेक मान्यवरांना आवाहन केले आणि त्याचा योग्य तो आदर या सर्व मान्यवरांनी त्यांच्या लेखमालेतून राखलेला आढळून येतो. यात लेखिका श्रीमती पुष्पा त्रिलोकेकर, सुप्रसिद्ध संगीतकार श्री प्यारेलाल शर्मा, पटकथाकार श्री सलीम खान, रंगभूषाकार श्री पंढरीनाथदादा जुकर, संगीत रंगभूमी गाजविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री जयमालाबाई शिलेदार, शिवाय समाजकारणातील सिंहाचा वाटा उचलणाऱ्या श्रीमती मृणालताई गोरे, सहकार क्षेत्रातील श्री बाळासाहेब विखे पाटील, वृत्तपत्रसृष्टीतले दिग्गज श्री मुरलीधर शिंगोटे यांच्या समृद्ध लेखणींचा समावेश आहे

या लेखमालांना वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या लेखमालांची पुस्तकेही लवकरच लोटस पब्लिकेशन वाचकांसमोर आणणार आहेत. कार्यक्रमाचे

सन्माननीय प्रमुख पाहुणे लोकप्रिय अभिनेते श्री सचिनजी खेडेकर आणि मुंबईचे माजी पोलीस महानिरीक्षक श्री प्रवीणजी दीक्षित यांची उपस्थिती पुस्तकांच्या अनुशंघाने एकदम चपखल होती. या दोन्ही मान्यवरांनी अतिशय मार्मिक विवेचन रसिकांसमोर मांडले. यातूनच लोटस पब्लिकेशनच्या प्रगल्भतेची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.



कार्यक्रम झाल्यावर लोटस पब्लिकेशनचे एम. डी. श्री समीरसिंह दत्तोपाध्येजी यांना भेटण्याची संधी मिळाली.


ते सांगत होते त्यांच्या पब्लिकेशनचा हेतूच मुळी समाजासाठी जे आवश्यक आहे तेचव बदलत्या काळाचे भान देणारं, निखळ आणि केवळ सकारात्मक साहित्य उपलब्ध करून देणे. नुसतं पुस्तक प्रकाशनापर्यंत पब्लिकेशनची जबाबदारी नाही तर त्यातून आजच्या पिढीवर चांगले संस्कार घडविणे, त्यांनी पुढे सांगितलं कि ही दोन्ही पुस्तके खालील संकेतस्थळांवर देखील मागविण्याची सोय आहे.

"गर्द सभोवती"

"गुन्हेगारांचे कर्दनकाळ न्यायवैद्यक शास्त्र

सतत जाणवते की लोटस पब्लिकेशन आयोजित हा पुस्तक प्रकाशन सोहळा म्हणजे एका उत्तुंग ज्ञानपर्वतावरून कोसळणारा धबधबाच.ज्याप्रमाणे एक विशाल नदीच्या सानिध्यात येणारे प्रदेश सुजलाम सुफलाम होतात अगदी त्याचप्रकारे लोटस पब्लिकेशनच्या, सानिध्यात येणारे प्रत्येक वाचक आणि मुखत्त्वे लेखक देखील सुजलाम सुफलाम होताना दिसतात.          

Sunday 18 June 2017

ज्योतिर्लिंग बाईक यात्रा २०१७


वर्ष २०१७ की शुरुआत बहुत ही अच्छी हुई।खास कर के २६ जनवरी से शुरू होनेवाली मेरी बाईक राईड तो यह जरूर प्रतीत कर रही थी।इस समय मैं मध्यप्रदेश स्थित ज्योतिर्लिंग यात्रा पर निकल पड़ा था। हमेशा की तरह प्रातः ४ बजे मैं अपने घर से निकलकर अपने जीवन मार्गदर्शक डॉ अनिरुद्ध जोशी (बापू) इन्होंने मुंबई के "खार" यहाँ स्थापन किये "श्री गुरुक्षेत्रम" का दर्शन लिया।




"श्री गुरुक्षेत्रम" हमेशा से हम सभी श्रद्धावानों के लिए सदैव और इकमात्र आधारस्थान है।इस का दर्शन लेकर अब तक मैं भारतभर मे अकेला बाईक राईड पर निकलता हूँ।एकदम निश्चिंत होकर, पुरे विश्वास से फिर वह लद्दाख का सफर हो या स्पीति वैली हो।हमारे बापू हमेशा कहते रहते है "केवल इक विश्वास चाहिये, फिर आपके गुरु आपके पालनहार हो जाते है " इस बात को हमेशा ध्यान में रखकर, हम जैसे कई श्रद्धावान जीवन की कई कठिनायों का सहज सामना कर विजय पाते है।मैंने NH-52 से नाशिक तक का सफर सिर्फ १० बजे के पहले ही तय कर लिया था।


इसके आगे महाराष्ट्र के रस्ते पर मैं पहली बार सफर कर रहा था। मुंबई के अलावा महाराष्ट्र के अन्य जिल्हों तक जानेवाली बहुतसी सड़के मैंने काफी सुस्थिति में पायी है। और नाशिकसे आगे धुले तक की सड़क मुझे अपनी मंजिल का लुफ्त उठाने में काफी सक्रीय पायी। मानो किसीने मेरे आने की ख़ुशी में गलीचा बिछाया हो।









अनजाने रास्तों की एक बात मुझे विशेष रूप से आकर्षित करती है। उस पर मिलने वाले गाँव , काफी नए और उनके नाम भी ऐसे की आप कभी भूल नहीं सकते। धुले से आगे काफी अलग गाँवों के नाम मिले थे जैसे "नरडाणा , सोनगीर ,सेंधवा ,धामनोद "। धामनोद से मुझे दाए मुड़ना था। अब तक सिर्फ हाइवे चला कर, मुझे और मेरे वॉरहॉर्स को काफी थकान सी महसूस हो रही थी। लगभग ५०० किमी का अंतर पार हो चूका था। शाम के ५ बज चुके थे। थोडीही दुरी पर में इक नदी का विशाल पात्र देख रहा था। वॉरहॉर्स (बाइक) ७० की स्पीड पर रहेगा, और इतने में इक बोर्ड आँखों के सामने से इतनी जल्द निकला, की मैं वहाँ रुक कर फोटो खींचने का विचार करने तक २०-३० मीटर आगे आ पहुंचा। उस बोर्ड पर लिखा था "नर्मदा "। कहने के लिए सिर्फ तीन अक्षर, पर उसकी गहराई मानवी परिमाणों से परे थी। कुछ समय उस को निहारने के बाद, मैंने काफी अलग स्फूर्ति महसूस की। उस स्फूर्तीने मेरे मन में एकहि सवाल खड़ा किया , कब मै भगवान श्री ओंकारेश्वर के दर्शन कर लूँ?धामनोद से बरवाह पहुँचने के लिए तक़रीबन डेढ़ घंटे का समय लगा था। सँकरी सड़क के वजह ६५ किमी जाने के लिए डेढ़ घंटा मेरे सब्र का बाँध तोड़ रहा था। हाइवे पर नर्मदाजी के दर्शन होने के पहले की स्थिति में केवल एक प्रोफेशनल राइडर की तरह चला रहा था। पर जिस वक्त मैंने नर्मदाजी का दर्शन किया तो सफर में काफी ठहराव सा आया था। क्या सुन्दर अनुभूति थी वह। क्यों न हो, भौगोलिक रूप से पानेवाली यह नदी कई श्रद्धवानों के लिए देवीमाँ समान जो है। बरवाह के चौराहे पर चाय की चुस्की लेने की इच्छासे वँहा स्थित एक चाय के ठेले पर मैं जा पहुँचा। इस चौराहे पर काफी भीड़ थी , कई लोगों का ताँता वँहा लगा था। स्वाभाविक रूप से उस इलाके का बड़ा मार्किट था। चाय इतनी जबरदस्त थी की एक कटिंग चाय अनजाने में तीन कटिंग तक पहुंची। चाय वाले को कल फिर वापिस चाय पिने आऊँगा ऐसा वादा करके आगे के १५ किमी अंतर पर बसें "श्री ओंकारेश्वर जी " की ओर मैं निकल पड़ा। तक़रीबन ८ बजह तक मैं नर्मदा स्थित "श्री ओंकारेश्वर जी " पहुँच गया था। थकान मानो कहाँ निकल गयी थी कुछ पता नहीं चल रहा था। समय की बिलकुल बर्बादी न करते हुए एक होटल मे मैंने रूम लिया। झट से नहा कर मैं "श्री ओंकारेश्वर जी " के दर्शन के लिए निकल पड़ा।नर्मदाबाँध स्थल पर मानवी क्षमताओं की कड़ी मेहनत से बना पूल है। यह पूल भगवान् से जुड़ने के लिए इच्छा और कड़ी मेहनत की आवश्यकता है इस बात का बार बार एहसास दिलाता है। ओंकारेश्वर आने वालों दर्शनार्थियों के लिए झूला पुल एक विशेष आकर्षण है। नर्मदा हाइड्रो इलेक्ट्रिक डेवलपमेंट कार्पोरेशन द्वारा वर्ष २००४ में ममलेश्वर सेतु नामक एक नए पुल का निर्माण किया गया। यह पुल है २३५ मीटर लंबा एवं ४ मीटर चौड़ा है। यह पुल सीधे मुख्य मंदिर के द्वार तक पहुँचता है। एवं पूरे वर्ष उपयोग में लाया जाता है। यहाँ से नर्मदा नदी ओंकारेश्वर बांध एवं मंदिर का मनोरम द्रश्य दिखलाई पड़ता है।श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग ऐसा एकमात्र ज्योतिर्लिंग है जो नर्मदा के उत्तर तट पर स्थित है। यहाँ भगवान शिव ओम्कार स्वरुप में प्रकट हुए हैं. एवं ऐसा माना जाता है की भगवान शिव प्रतिदिन तीनो लोकों में भ्रमण के पश्चात यहाँ आकर विश्राम करते हैं। अतएव यहाँ प्रतिदिन भगवान शिव की शयन आरती की जाती है, एवं भक्तगण एवं तीर्थयात्री विशेष रूप से शयन दर्शन के लिए यहाँ आते हैं।रात को शयन आरती से मंदिर गूँज उठा था। भगवान् ओंकारेश्वर की शयन आरती के पश्चात रात्रि ९ बजे से ९:३० बजे तक भगवान् के शयन दर्शन होते है। जिसमे भगवान् के शयन हेतु चांदी का झूला लगाया जाता है, तथा शयन सेज बिछाई जाती है, तथा सेज पर चोपड़ पासा सजाया जाता है एवं संपूर्ण गर्भगृह का आकर्षक श्रृंगार किया जाता है। ऐसी किवदंती है कि प्रतिदिन भगवान् भोलेनाथ एवं माता पार्वती रात्रि विश्राम हेतु यहाँ विराजते है।


अतः श्रद्धालु एवं दर्शनार्थी भगवान् ओंकारेश्वर के शयन दर्शन अवश्य करे। यदि श्रद्धालु एवं दर्शनार्थी अपने शुभ प्रसंगों के अवसर पर विशेष श्रृंगार कराना चाहते है तो मंदिर कार्यालय में संपर्क कर जानकारी प्राप्त कर सकते है।उस रात सिर्फ ५० -६० भाविकों की भीड़ थी। आरती पूरी होने तक १०० - १२५ तक लोग जमा हो गए थे। इक जगह बच्चों को कंधों पर उठाये उनके पिता अपने बच्चोंके मन में भगवान् शिवजी के प्रति भक्ति के बीज बोते हुए पाए, तो दूसरी ओर अपने बूढ़े माँ-पिता को शिवजी मंदिर की सीढियाँ चढ़ाते हुए बेटे, अपने मातृ-पितृ ऋण को चूकाते पाए।


रात को नर्मदाजी का दर्शन ठीक तरह से कर नहीं पाया इस कारण प्रातः जल्द उठकर वापिस "श्री ओंकारेश्वरजी "के दर्शन और तत्पश्चात नर्मदाजी के भी दर्शन करने की मनीषा से होटल आ पहुँचा।


बाइक राइड पर मेरा इक नियम है, शरीर के रईसी ठाटबाठ को बिलकुल स्थान नहीं। जो भी मिला उसे सही मानकर अपनाना यह मेरे बाइक राइड की ख़ास बात है। महाराष्ट्र में कई सालोंसे प्रचलित पंढ़रपुर वारी(यात्रा) का बड़ा प्रभाव और असर मेरी बाइक राइड पर है। सुबह सात बजह से पहले मंदिर पहुंचना था। इसलिए सुबह ठीक ६ बजे उठकर , शुचिर्भूत होकर में मंदिर पहुंचा। शिवजी को बेल,फूल और नर्मदा जल से अभिषेक कराकर मैं नर्मदा तट पर पहुंचा।नर्मदाजीके तटपर इक अलगही अनुभूति पायी जिसका शब्दोंमे वर्णन करना असंभव है। नर्मदा जिसे रेवा या मेकल कन्या के नाम से भी जाना जाता है। मध्य भारत कि सबसे बड़ी एवं भारतीय उपमहाद्वीप कि पांचवी सबसे बड़ी नदी है। यह पूर्णतः भारत में बहने वाली गंगा एवं गोदावरी के बाद तीसरी सबसे बड़ी नदी है। यह उत्तर भारत एवं दक्षिण भारत के बीच पारम्परि विभाजन रेखा के रूप में पश्चिम दिशा कि ओर १३१२ किलोमीटर तक बहती है एवं गुजरात में भरूच नगर के ३० किलोमीटर पश्चिम में अरब सागर में खम्बात कि खाड़ी में गिरती है।नर्मदा परिक्रमा किसी भी तीर्थ यात्रा कि तुलना में सर्वाधिक कठिन चुनौतीपूर्ण एवं पवित्र कार्य माना जाता है। साधू संत एवं तीर्थ यात्री भरूच से पदयात्रा प्रारंभ करते हैं एवं नदी के साथ चलते हुए मध्यप्रदेश में अमरकंटक में नदी के उद्गम स्थल तक जाते हैं एवं दूसरी दिशा से वापस भरूच तक जाते हैं। यह कुल २६०० किलोमीटर लंबी यात्रा है. इस मार्ग में पड़ने वाला एकमात्र ज्योतिर्लिंग श्री ओंकारेश्वर है।


दिप प्रज्वलित कर नर्मदाजीको प्रणाम कर मैं भगवान् ममलेश्वर के दर्शन हेतु घाटी चढ़ने लगा। ओंकारेश्वर और ममलेश्वर यह दोनों एक ही ज्योतिर्लिंग है , इस बारे में शिवपुराण में विस्तृत कथा पायी जाती है। एक ही ओंकारलिंग दो स्वरूपों में विभक्त हो गया। प्रणव के अन्तर्गत जो सदाशिव विद्यमान हुए, उन्हें ‘ओंकार’ नाम से जाना जाता है। इसी प्रकार पार्थिव मूर्ति में जो ज्योति प्रतिष्ठित हुई थी, वह ‘परमेश्वर लिंग’ के नाम से विख्यात हुई। परमेश्वर लिंग को ही ‘अमलेश्वर’ (ममलेश्वर)भी कहा जाता है। इस प्रकार भक्तजनों को अभीष्ट फल प्रदान करने वाले ‘ओंकारेश्वर’ और ‘परमेश्वर’ नाम से शिव के ये ज्योतिर्लिंग जगत में प्रसिद्ध हुए। इन दोनों के बीच नर्मदा जी बहती है। नर्मदाजी के उत्तर में ओंकारेश्वरजी बसे है तो दक्षिणी तट पर ममलेश्वरजी।




घाटी चढ़कर उपर की तरफ ममलेश्वरजी का मंदिर है। घाटी के दोनों तरफ बिल्वपत्र , फूल, चढ़ावा से सजी दुकानों की भागदौड देखते ही बनती है। ममलेश्वर यह मंदिर काफी पुरातन है। ममलेश्वर मंदिर ज्यादा बड़ा मंदिर नहीं है। भगवान शिव, शिवलिंग रूप में पवित्र स्थान के केंद्र में मौजूद है। ममलेश्वर ज्योतिर्लिंग में आप खुद के द्वारा शिवलिंग को अभिषेकं कर सकते हैं और छू सकते हैं । यहाँ कोई रोकथाम नहीं है। और श्रद्धालु इसका पूरा लाभ उठा रहे थे। मैं इसके लिए अपवाद नहीं था।दर्शन कर तृप्त हुए मन से मैं होटल पहुँचा। वहा से निकलने की बिलकुल मनीषा नहीं थी। पर वक्त को मद्देनजर रखते हुए बहुत कठिनाई से मन को समझाया। आगे का रास्ता था ओंकारेश्वर से उज्जैन स्थित।


अगले भाग में जानेंगे भगवान् श्री महाकालेश्वर जी के और उज्जैन की कुछ खास बातें।आगे की यात्रा उज्जैन स्थित महाकालेश्वर के बारे में


ओंकारेश्वर मंदिर के बारे में कुछ उपयुक्त जानकारी :

मंदिर खुलने का समय:

प्रातः काल ५ बजे - मंगला आरती एवं नैवेध्य भोगप्रातः कल ५:३० बजे – दर्शन प्रारंभ

मध्यान्ह कालीन भोग:

दोपहर १२:२० से १:१० बजे – मध्यान्ह भोगदोपहर १:१५ बजे से – पुनः दर्शन प्रारंभसायंकालीन दर्शन:

दोपहर ४ बजे से – भगवान् के दर्शन(बिल्वपत्र, फूल, नारियल इत्यादि पूजन सामग्री गर्भगृह में ले जाना ४ बजे बाद प्रतिबंधित है|)

शयन आरती:

रात्रि ८:३० से ९:०० बजे – शयन आरतीरात्रि ९:०० से ९:३५ बजे – भगवान् के शयन दर्शन

Thursday 23 March 2017

ज्योतिर्लिंग बाईक राईड २०१५

बराच वेळ उलटून गेला तरी रॊमी काही आला नव्हता. डिसेंबर महिन्यात पहाटे सायन हायवेवरून भरधाव जाणाऱ्या वाहनांची लगबग बघून जीव अजून अधीर होत होता. २०१५ चा नाताळ शुक्रवारी आल्याने नाताळ बाबाने आम्हा ऑफिसवर्गाला शनिवार- रविवार जोड सुट्टीची चांगलीच भेट दिली होती. मग अशात एक राईड तर नक्कीच व्हायला पाहिजे. मग मी, रॊमी आणि निखिल असे तिघेच महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगे करण्यासाठी निघालो. भल्या पहाटे थंडीत एखाद्याची वाट बघणे म्हणजे काय वैताग असतो त्यात उशीर होत असेल तर विचारायची सोय नाही. इतक्यात रॊमी आला त्याच्यावर शिव्यांचा भडीमार करणार इतक्यात त्याने बाईकवरून  उतरून मिठी मारली. "सॉरी यार" यात सगळं प्रकरण थंडावलं होत. पण माझे समाधान म्हणून शिव्यांची लाखोली वाहिलीच. त्याच्या बाईकचा एक्स्ट्रा फ्लड लाईट वाटेत पडला. तो कसा बसा अडकवून तो तिथपर्यंत पोहचला होता. मग जवळच्या रसशीने मी तो बऱ्यापैकी आवळला. इतक्या पहाटे गॅरेज मिळणार नाही म्हणून पुण्यात जाऊन बघू असे ठरवून आम्ही दोघेही पुण्याच्या दिशेने भरधाव निघालो. आम्हाला वाजता पुण्यात पोहचायचे होते पण सहा वाजता आम्ही वाशी टोलनाका क्रॉस करीत होतो. निखिल पुण्याला भेटणार होता, उशीर झाल्याचे त्याला तसे कळविले

मुंबई- लोणावळा वॉरहॉर्सच्या अगदी परिचयाचा रस्ता, अतिशयोक्ती करयाची झाली तर तो स्वतःच या रस्त्यावर अगदी भरधाव धावतो. कुठेही फालतू टाइम पास करता आम्ही लोणावळ्यात पोहचलो. आता लोणावळा आला आणि अन्नपूर्णा मधील नाश्ता नाही केला तर पापच असल्याच्या आविर्भावात, मी आणि रॊमी डायरेकट् अन्नपूर्णाच्या पार्किंग लॉट मध्ये अवतरलो. यथेच्छ नाश्ता करून पुण्याच्या दिशेने झेपावलो. अवघ्या चार तासात आम्ही पुण्याअलीकडे ठरल्या ठिकाणी निखिलला भेटलो. एव्हाना १० वाजले होते. तळेगावच्या वर्दळीतून मार्ग काढत आमच्या तिघांच्या बाईक्स भीमाशंकरच्या दिशेने कूच करीत होत्या.भीमाशंकर कडे जाण्याचा रस्ता अतिशय विलोभनीय आहे.





पावसात तर या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे निसर्गप्रेमींसाठी सुखाची पर्वणीच म्हणावी लागेल. आजचा दिवस आम्ही भीमाशंकरचे दर्शन घेऊन रात्रीपर्यंत औरंगाबाद ला पोहचायचा प्लॅन केला होता. जवळपास च्या आसपास आम्ही  भीमाशंकर मंदिराजवळ पोहचलो

नाताळच्या जोडून आलेल्या सुट्टयांमुळे सहाजिकच मंदिरात दर्शनासाठी भली मोठी रांग होती. भीमाशंकरचे दर्शन करून रात्रीपर्यंत औरंगाबाद गाठायचे होते. पण रांगेची व्याप्ती बघून प्लॅनला तडा नक्कीच जाणार होता. मग आम्ही तिघे बुचकळ्यात पडायच्या आधीच ठरिवले श्रद्धा आहे पण मग सबुरीचे काय? रांगेत उभे राहायचं नक्की केले मग कितीही वाजू देत. तब्ब्ल चार तासांनी आम्ही दर्शन'घेऊन गाडीच्या दिशेने निघालो. 






मग जवळच्याच टपरीवजा हॉटेलात जे मिळालं ते निमूटपणे पोटात ढकलून, औरंगाबादच्या दिशेने मार्गस्थ झालो. तीर्थ यात्रा म्हणजे नक्की काय याचा अनुभव मला येत होता. इथं यात्रेत तुमच्याकडे अमाप पैसे खिशात असून सुद्धा कामी येत नाही, कामी येते ती फक्त तुमची जाणीव. जाणीव ही कि परमात्मा माझ्यावर खूप खूप प्रेम करतो. मग जीवनयात्रा ती वेगळी काय? जीवनयात्रा आनंदाने जगायची असेल तर मग वरील जाणीव लक्षात ठेवायची. एकदम सोप्प होऊन जातं सगळं.

संध्याकाळचे चार वाजले होते आणि औरंगाबादसाठी जवळपास २९० किमी अंतर तुडवायचे होते. कितीही घाई केली तरी रस्त्याचा अंदाज घेता किमान आठ तास लागणार होते. मग आज रात्री अहमदनगर गाठायचे ठरविले. नारायणगाव- आळेफाटा- सावरगाव-धोकेश्वर मार्गे सुमारे दहाच्या सुमारास आम्ही अहमदनगरला पोहचलो. कडाक्याच्या थंडीने अक्षरशः कुडकुडणे या शब्दाची खरी अनुभूती मिळत होते. अहमदनगरच्या थंडीने कुडकुडणे म्हणजे हाडांचा थरकाप. एका गार्डन रेस्टोरंटमध्ये जेवताना बाजूला शेगडी लावली जेणेकरून निखाऱयांची धग मिळली. आत्तापर्यंत निखाऱ्यावर फक्त कणसं आणि तंदुरीचे प्रकार हेच पाहिले होते पण हे काही अजबच होते. सुरवातीला मला वाटलं की गरम गरम रोटी तिथल्या तिथे बनवून देणार की काय? पण ती शेगडी आमच्यासाठी लावली होती. मुंबईच्या आम्हाला इतकी थंडी म्हणजे जरा कटू अनुभवच म्हणावा लागेल.



 एका हॉटेलवाल्याशी हुज्जत घालून कशीबशी एक रूम ११०० रुपयात मिळवली. जवळपास १च्या आसपास तिघांचेही घोरण्याचे सूर एकमेकांत अलगद मिसळून गेले असावेत. "मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा " या गाण्याचा स्पीड जसा वाढत जातो तशाच प्रकारे अगदी थोड्याच वेळात सगळ्या रूम भर आमचे सूर घुमू लागले असतील. मी घोरतो हे मला माझ्या अर्धांगींनीने बहुतेकवेळा सांगितले आहे आणि निखिल आणि रोमीचे सूर मी त्यारात्री ऐकले होते म्हणून यात शंका नसावी

दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता उठून लगबगीने आंघोळ उरकून साडे पाचच्या सुमारास आम्ही औरंगाबादच्या दिशेने आप आपले वारू उधळले. 





त्या थंडीत ६०च्या स्पीडने गाडी चालविताना वारा अक्षरशः सर्वांग सुन्न करू पाहात होता. सुदैवाने उत्तम रायडींग सामग्री असल्याने (Riding Gears) कसबसं आम्ही त्या थंडीला थोपवू शकत होतो. 


जवळपास ८च्या आसपास घृष्णेश्वर मंदिराजवळ येऊन थबकलो. पुन्हा रांग आमची वाट पाहात होतीच.             

पुन्हा


जवळपास अडीच एक तास रांगेत काढल्यावर जबरदस्त दर्शनाचा अनुभव सगळं क्षीण घालवत होता.


आज रात्री आम्हाला औंढा नागनाथचे दर्शन घेऊन मग पुढे परळी वैजनाथ येथे पोहचायचे होतेसुमारे ३२५ किमी च्या आसपासचे अंतरपरत दर्शन रांगेचे गणितजुळविले तर लक्षात आले की जवळपास १४ तास तरी जाणार आणि ते शक्य नव्हतेकारण एकच. महाराष्ट्रातील या भागातून रात्रीचा प्रवास म्हणजे दरोडेखोरांची भीतीमाहीत असून उगाचचे धाडस करणे म्हणजे मूर्खपणा आणि तो आम्ही तिघांनीही धुडकावून लावला होतामग जालना,  जिंतूर मार्गे औंढाला पोहचायचे ठरलेशाळेतअसताना भूगोलात वाचलेली शहरे बाईकवरून बघताना एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळत होताराईडमुळे ही शहरे नुसती पाहावयाला नव्हे तर अनुभवायलाही मिळतहोतीकारण जागोजागी तुम्हाला रस्ता विचारावा लागतोमग अनुशंघाने तेथील लोकसंपर्क ही आलामातीचा गुण हा तिथे वावरणाऱ्या लोकांना लागतो हे फार खरं आहेभाषाशैली तर मैला मैलाला बदलतेम्हणजे भाषा मराठीच पण वक्तृत्त्वशैली इतकी निराळी की मराठी भाषेचा अपभृंश पावलोपावली जाणवतो.

देव तारी त्याला कोण मारी:
संध्याकाळचे सात वाजून गेले होते आणि आम्ही जिंतूरच्या चौकात येऊन पोहचलो.  चहाची तलप आल्याने आम्ही तिघेही एका टपरीपाशी उभारलो आणिचहाची ऑर्डर दिलीतिखट खमंग चिवडा आणि चहाचे घोट रिचवित आम्ही तिघेही संतुष्ट झालोफक्त ४५ किमी चा टप्पा बाकी राहिला होताम्हणजे जास्तीत जास्त १तासथंडीचे दिवस असल्याने सर्वत्र अंधार पसरला होतात्यात मी निखिल आणि रोमी यांना पुढे जाण्यास सांगितले कारण दोघांनाही अंधारात गाडी चालवायला त्रासहोत होता आणि त्यामुळे ते हळूहळू जात होते आणि मला हळूहळू गाडी चालवून कंटाळा आला होतारात्रीच्या रायडींच्या बाबतीत जरा मी दोघांच्या तुलनेत उजवाच ठरलोहोतोमग मागाहून जवळपास पंधरा मिनिटाच्या अंतरावर मीदेखील निघालो.

औंढा नागनाथ ला जाण्यासाठी नांदेड रोडने जावे लागतेमी मुद्दामून गाडी ६० च्या स्पीडवर ठेवली जेणेकरून मी निखिल आणि रोमीला अर्ध्या रस्त्यात गाठू शकेनपंधरा मिनिटे होऊन गेलीत तरी रस्त्यात निखिल आणि रोमी काही केल्या दिसेनात म्हणून मग मी गाडीचा स्पीड ७०च्या आसपास आणलादहा मिनिटे झाली तरी तेदोघे काही दिसेनात बरं कुठे चुकामुक व्हावी तर रस्त्याला वळणे किंवा फाटेदेखील नाहीतम्हणजे अगदी सरळ रस्तामग हे दोघे नक्की कुठल्या दिशने गेलेतमनातशंकांचे काहूर उठू लागले त्यात सोबतीला किर्रर्र अंधार आणि थंडीने पाने सुकून गेलेली झाडे रस्त्याच्या दुतर्फा अगदी ओघाओघाने भीषणतेची जाणीव करून देत होती.
हळूहळू माझ्या लक्षात आले की आतावर सोबत असलेली वाहतुकीची आणि माणसांची वर्दळ क्षणात नाहीशी झाली होती.  वातावरणात एक वेगळीच स्मशान शांततापसरली होतीअंधाऱ्या रस्त्यात दूरवर पसरलेला माझ्या बाईकचा लाईट जेवढा रस्ता दाखवत होता तेवढंच विश्व् नजरेच्या टप्प्यात शिवाय दुतर्फा सुकलेली झाडे त्यांच्याविचित्र आकाराने माझ्या मनात भीतीचे सावट पसरवू पाहत होती. याचा अर्थ ते दोघे नाही तर मीच आडवळणाला लागलो होतो. आतापर्यंत भारतात अनेक ठिकाणी मी एकट्याने बाईकवरून प्रवास केला होता. माझ्या मनात विचार येत होता की हा चकवा तर नसावा. आता पर्यंत चकवा या बद्दल ऐकून होतो पण कधी अनुभव आला नव्हता. पण चकवा लागल्यास मनुष्य एकाच जागी पुन्हा पुन्हा घोळत राहतो परंतु इथेतर रस्ता दूरवर कुठेतरी निघून जात होता. आणि हो तो औंढा नागनाथ च्या दिशेने तर नक्कीच जात नव्हता कारण गेली जवळपास अर्धा तास होऊन गेली तरी अजून एखादी वस्ती किंवा रस्त्याचा एखादा बोर्ड पण दृष्टीक्षेपात आला नव्हता.

त्या निरव शांततेत असलेली विलक्षण भयानता आता अगदीच प्रखर वाटू लागली होती, नको नको ते भास होऊ लागले. क्षणात मला असं वाटू लागलं नक्कीच कुणीतरी माझ्या बाइकच्या पाठच्या सीटवरच बसलं आहे आणि पूर्ण बाइकचा ताबा त्याच्याकडे असून  एका कटपुटली प्रमाणे मी त्याच्या आदेशानुसार गाडी चालवत आहे. त्या वाईट शक्तीची ताकत फारच जास्त असावी कदाचित, कारण माझ्यापरीनं घाबरण्याचा माझा केविलवाणा प्रयत्न पुरता फसला होता. मला कळून चुकलं होतं की याचा शेवट नक्कीच चांगला नसणार. हळूहळू माझ्या जाणिवा शिथिल होऊ लागल्याचा मला भास होऊ लागला कारण मुखी चालू असलेला जप माझ्या कानावर पडत नव्हता. या  गोष्टी दुसऱयांकडून ऐकल्या होत्या पण स्वतः अनुभवताना काय पंचाईत होते ती मी अनुभवत होतो.

तेव्हाच माझे जीवन मार्गदर्शक गुरु डॉ अनिरुद्ध जोशी यांची तीव्रतेने आठवण झाली आणि मनोमन त्यांनी अंगी बाणविलेला आत्मविश्वास अक्षरशः उफाळून आला. परमात्मा माझ्यावर खूप खूप प्रेम करतो या त्यांनी मनावर ठसविलेल्या वाक्याची आठवण झाली आणि माझ्या परमात्म्याला मी मनापासून साद घातली. इतक्यातच मागून लक्ख प्रकाश दिसला. मी गाडीच्या काचेत पाहिले असता दोन वर्तुळाकार लाईट माझ्या दिशेने येताना दिसले. रोमी आणि निखिलच्या गाड्यांचे लाईट पाहून मला हायसे वाटले. फारच वेगाने ते दोघे माझ्या दिशेने येत होते.त्यांच्या गाड्या माझ्या अगदी जवळ आल्या म्हणून मी माझी गाडी थांबविली. तेव्हा मला लक्षात आले की ती एक चार चाकी गाडी होती. त्यातील माणसाने गाडी थांबवून मला विचारले की औंढा नागनाथचा रस्ता हाच का? मी आपसूकच मान हलविली. गाडी पुढे निघाली. आणि गाडीच्या मागच्या काचेवर लिहलं होते, "जय मल्हार" आणि "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे".  मला देवाचा इशारा कळून चुकला होता यावेळी देव पाठीशी नाही तर माझ्या पुढे होता त्या संकटात माझ्यासाठी धावून आला होता. मीही त्या गाडी मागोमाग पुढे निघालो. अवघ्या २० मिनिटात मी त्या गाडीपाठोपाठ ओंढा नागनाथ मंदिरापाशी पोहचलो. ती गाडी तशीच भरधाव वेगाने पुढे निघून गेली.

इतक्यात माझ्या खिशातील फोन वाजला, निखिलचा होता, त्याच्याशी बोलल्यावर लक्षात आले की ते दोघे रस्त्यातच माझी वाट बघत उभे आहेत. तासाभराच्या अंतराने आम्ही तिघे पुन्हा एकत्र भेटलोघडला प्रकार मी त्या दोघांनाही सांगितला. सरळ रस्त्यावर पुढे गेलेल्या या दोघांना मी दिसलो कसा नाही. शिवाय बुलेटचा आवाज दुर्लक्षित करणे ही अशक्य बाब. अशा अनेक प्रश्नांवर आम्ही अनुत्त्तरीतच होतो. नक्कीच काहीतरी विचित्र प्रकार होता. पण देवकृपेने काही अमंगल घडले नाही.

ओंढा नागनाथ तसं अविकसित खेडेगाव म्हणायला हरकत नाही. ज्योतिर्लिंग यात्रेमुळे येणारी गर्दी इतकीच काय ती या गावाची जगातील इतर लोकांशी असलेली ओळख म्हटली तर वावगे ठरणार नाही. परीणामी राहण्यासाठी हॉटेल फारच मोजकी. जोडून आलेल्या सुट्टयांमुळे इथली तुरळक हॉटेलं तुडुंब भरलेली होती. मग काय एका हॉटेलच्या पार्किंग लॉट मध्ये आम्ही आपल्या गाड्या आणि स्वतःला पार्क केले. हो बरोबर वाचलंत त्या रात्री आम्ही पार्किंग मध्येच झोपलो. हॉटेलच्या वॊचमनने एक सतरंजी आणून दिली. ती पसरून आम्ही तिघे त्या थंडीत उघड्यावरच झोपलो. अंगावरचे रायडींग जॅकेट काढता तसेच झोपी गेलोतीन चार तासाच्या झोपेच्या प्रयत्नात पहाटेचे चार वाजले. त्या कडाकाच्या थंडीत थंड पाण्याने आंघोळ करताना लहानपणीची एक आठवण झाली. पहाटेच्या संधीप्रकाशात इमारतीच्या गच्चीवरील टाकीत जाणाऱ्या पाइपवर बसलेल्या कावळ्यांची आंघोळ. कावळ्याची आंघोळ हा शब्द प्रयोग आमच्या त्या आंघोळीला तंतोतंत लागू पडला होता. वॊचमनच्या हातात एक शंभर रुपये दिले. त्या सतरंजीची किंमत लाख मोलाची होती पण व्यवहार आडवा आला होता.

पहाटेच पाचच्या सुमारासच आम्ही दर्शन घेतले अगदी निवांतपणे. भल्यापहाटे ते सुद्धा थंडीच्या सीजनमध्ये चहाचा आस्वाद घेणे यासारखे सुख नाही. सोबतीला सर्वत्र सहज उपलब्ध असणारा पारले-जी चा गोड हसणारा मुलगा भारतात कोठंही आपल्या मदतीला धावून येतो आणि गरज असलेलं ग्लुकोज देऊ करतो. चहा आणि पारले-जी चा फन्ना उडवून आम्ही परळीच्या दिशेने निघालो. मॉर्निंग ग्लोरी काय धमाल असते आणि विशेषतः बाईक सफर करताना तर ती विशेष खुलते.

परभणी- गंगाखेड मार्गे आम्ही परळीला पोहचलो. रांगेचे बिगुल इथे मात्र शांत झालेले होते. सहज सोप्या आणि रमणीय ठिकाणी पर्यटकांचा राबता असतो म्हणून भीमाशंकर आणि घृष्णेश्वर येथील गर्दी आम्हाला औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ येथे सुदैवानं नाही मिळाली. दर्शन घेऊन मग आंबेजोगाई मार्गे आधी अहमदनगर आणि मग पुण्याला रात्री दहा पर्यंत पोहचलो. निखिल पुण्याला राहत असल्याने आता पुढचा मुंबई पर्यंतचा प्रवास मी आणि रोमीच करणार होतो. जवळपास अडीच वाजे पर्यंत पोहचतो असे मी वर्षाला सांगितले. नेहमी प्रमाणे राईडवरून आल्या आल्या गरमागरम कडी भात करून ठेवण्यासाठीची आगाऊ सूचना मी दिली होती. सकाळी सहा वाजल्यापासून जवळपास ५०० किमीचा प्रवास करण्यासाठी आम्ही जवळपास १३-१४ तास राईड करीत होतो. नाही म्हटलं तरी थकवा होताच.

पुण्यात पोहचे पर्यंन्त रोमी दोनदा वाटेत थांबला होता. डोळ्यांवर झापड येत असल्याने, शिवाय रात्री समोरून येणाऱ्या गाड्यांच्या लाईटने तो फारच त्रस्त झाला होता. पण काही केल्या आम्हाला उद्या कामावर पोहचायचे होते. राईड करताना कामाशी कोणतीच प्रतारणा मी अद्याप केलेली नाही आणि या तत्त्वावर ठाम राहण्यासाठी मी नेहमीच परमेश्वराकडे साकडे घालीत असतो. परंतु निखिलने पुण्यात त्याच्या घरी राहण्याचा ठिय्याच मांडला. आज रात्रीचा मुक्कामपोस्ट निखिल म्हैन्द्रकरांचे निवासस्थान पण एका अटीवर उद्या सकाळी पहाटे लवकर निघून नॉन स्टॉप मुंबई.


दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजताच आम्ही निखिलचं घर सोडलं. सकाळच्या वेळेत लोणावळ्याला पोहचेपर्यंत आम्ही दोघेही मडक्यातल्या कुल्फीप्रमाणे गार झालो होतो. लोणावळ्यात चहा घेताच थंडीचे आवरण गळून पडलं होते. कात टाकलेल्या सापाप्रमाणे मी आणि रोमी मुंबईच्या दिशेने सुटलो. एव्हाना ऊनाने थंडीची चादरीची घडी घालून तिला बाजूला केलं होतं. आमच्या गाडयांनी चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला होता. मजल दरमजल करीत अवघ्या एका तासात आम्ही वाशी टोलनाका गाठला होता. ठीक आठच्या सुमारास आम्ही वाशी ब्रिज ओलांडत होतो. वेळेत पोह्चल्याचा आनंद आम्हा दोघांच्याही चेहऱ्यावर दिसत होता.

परमेशवराच्या कृपेने सकाळी दहा वाजता ऑफिसात अलगद लॅपटॉप चालू करताना मी विचार करीत होतो की एका तासापूर्वीचा माझा पेहराव हा रायडींग गेयर्सनी सुस्सज रायडरचा होता आणि आता टिपिकल ऑफिस अटायर मध्ये. एकाच व्यक्तीची भिन्न परंतु सकारात्मक क्षमता/ कलागुण  त्याच्या सामर्थ्याची जाणीव करून देतात. माझे जीवनमार्गदर्शक डॉ अनिरुद्ध नेहमीच आम्हाला verstile personality चे महत्त्व सोदाहरण समजवून सांगतात. त्यांच्या अंगी असलेल्या अनेक क्षमता/ कलागुण मी जेव्हा जेव्हा बारकाईने अभ्यासण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा माणूस म्हणून मी स्वतःची किती प्रगती करू शकतो यावर विश्वासच बसत नाही. बऱ्याच वेळेला लोकं मला प्रश्न विचारतात की तू ऑफिस आणि रायडींग हे कसं मॅनेज करतो, खरं सांगू, अगदी मनापासून सांगतो, पावलोपावली डॉ अनिरुद्धांचे मिळणारे अमूल्य मार्गदर्शन मला जीवनात अनेक गोष्टींचा सुवर्णमध्य गाठण्यास फार मदत करते.