माझ्याबद्दल

मी ओंकार जयवंत वाडेकर, शिक्षण MBA Finance, सध्या शॉपर्स स्टोप येथे Finance विभागात कार्यरत  आहे. वयाच्या आठव्या वर्षी बाबांनी पहिल्यांदा स्कूटरचे हँडल  हाती दिले, तेव्हापासूनच मला रायडिंगचे वेड लागले. बाबा नेहमीच आम्हाला अशा धाडसी गोष्टींसाठी सतत प्रोत्साहित करत. कदाचित लहान मुलांना त्यावेळी (१९८५ साली) स्कूटर शिकवणारे बाबा पूर्ण अंधेरीत तरी एकटेच असावेत. आमच्यासाठी माझ्या बाबांसारखे कुणीच नाही असा सार्थ अभिमान होता व आजही आहे. बाबा मागे बसायचे आणि आम्ही रायडर. बाबांनी गाडी चालविण्याबद्दलचे व रस्त्यावरील प्रसंगावाधानाबाबत दिलेले धडे आजहि पुष्कळ कामी येतात. 

वयाच्या १८ व्या वर्षीच बाबांनी मला माझ्या नावे पहिली बाइक घेतली पण एका अटीवर त्याचा maintenance चा खर्च मी स्वतः करायचा.  छंद जोपासायचा पण त्यासाठीची जबाबदारी पार पाडायची हिम्मत असेल तरच. "Siemens India " या जर्मन कंपनीत काम करणारे आमचे बाबा व शासकीय कर्मचारी असलेली आमची आई व एक भाऊ असे ससुखवस्तु कुटुंबात जन्मलेल्या मुलाला (मला) त्यावेळी बाबांचा निर्णय काही रुचला नव्हता. पण आज मी स्वतः बाबा झाल्यावर, त्यांचा त्यावेळीचा निर्णय किती योग्य होता हे समजले . पर्यायाने मला पार्ट टाइम काम करणे भाग पडले व आपला छंद स्वकर्तुत्वावर कसा पार पाडायच याचे प्रात्यक्षिक मला त्याकाळी मिळाले.

२००३ साली मी शॉपर्स स्टोप मध्ये रुजू झालो. एकदा पार्किंग लॉट मध्ये बाइक पार्क करताना शेजारी उभ्या असलेल्या रॉयल एन्फ़िएल्डवर माझे लक्ष्य गेले. मी त्याकडे आशाळभूत नजरेने पाहतच उभा राहिलो. तिचा रुबाब, तिची यंत्रणा, ती आणि फक्त तिच. दिवस रात्र मला तिचा ध्यास लागला. पण नव्वद हजाराची बाइक घेणे मला त्यावेळी शक्यच नव्हते. आपला छंद स्वकर्तुत्वावरच पार पाडायचे बाळकडू होतेच. शेवटी २०१२ साली मी एक जुनी २००२ सालची इलेक्ट्रा घेतली. लाडाने तिला मी "warhorse " म्हणतो. हो कदाचित तुम्ही मला वेड म्हणाल पण रॉयल एन्फ़िएल्डचे प्रेम काही वेगळच असते.

5 comments:

  1. Being classmate of Onkar I know how adventurous he was from childhood. Being a responsible employee of a corporate firm, He is easily managing his work and passion. Salute to Onkar and his Warhorse...! We expect lots of International Tour from Him Now. All The Best Dear.
    Enjoy, Mahendra Shinde

    ReplyDelete
  2. Onkar great passion of yours and salute to your father who imbibed such good principles in you from childhood.
    My son Omkar Karande is also bikelover and his passion for Royal enfield is same like you. so can understand your passion in better manner.
    All the best for fulfilling your dream of Royal Enfield and like to read more about your adventurous journeys...

    ReplyDelete
  3. sollid experience onkarsinh..u ar absolutely right bike wed khup bhannat aahe..bapu bless u..ambadnya

    ReplyDelete