आजवर भारतभर बुलेटने
प्रवास करताना अनेक जुन्या नवीन गोष्टी ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडत आलो.
पण आजची माझी ब्लॉगयात्रा ही थोडीशी आडमार्गाला जाऊन एका सुंदर वळणावर विसावते. दि.
२६/६/२०१७ माझ्या जीवनातील
एक अविस्मरणीय संध्याकाळ
ठरली. कारण ही तसेच होते.
लोटस पब्लिकेशन प्रा.
लि . ने आयोजित
केलेला पुस्तक प्रकाशन
सोहळा .आजच्या डिजीटल
युगात एकीकडे जिथे
उथळ वाचकवर्ग बहुतांश
किंडल , व्हाट्सएप , फेसबुक
या मांदियाळीत चैन
करीत असताना, दुसरीकडे
सुजाण, विवेकी वाचक
वर्ग, चांगलं, बुद्धीला
आणि मनाला प्रेरणा
देणाऱ्या साहित्याच्या शोधात भटकत
आहेत ह्याची फार
मोठी खंत जाणवते.
नवी पिढी तर दृकश्राव्यात इतकी बुडाली
आहे की वाचन आणि त्याआधारे
कल्पना करून त्या
स्थितीचे चित्र डोळ्यासमोर
आणून त्याची जाणीव
करणे ह्या क्रियाशीलतेकडे
पाठ फिरवीत आहेत
. काही अपवाद आहेत
पण फारच कमी.
वाचन संस्कृतीची उत्पत्ती म्हणजे
सक्षम, सुजाण व्यक्तिमत्त्व
आणि पर्यायाने भक्कम
समाज. उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा
पायाच मुळी सकस
वाचनाचा आहे . पण
आज हल्ली चांगले
साहित्य आम्हा वाचकांच्या
समोर मांडते तरी
कोण ? आणि मांडले
तर त्याला योग्य
ते सादरीकरण आणि
उचित मार्गदर्शनाची जोड
देणारी पब्लिकेशन तरी
किती? पण ह्या सर्व चिंताग्रस्त
प्रश्नांना तडा देत
वाचक आणि मुखत्त्वे
चांगल्या लेखकांच्या मदतीला लोटस
पब्लिकेशन उभे ठाकले
आहे. वाचन आणि
लेखन संस्कृती वर्ग
लयास जात असल्याच्या
बाष्कळ गप्पा नव्हे
तर मोठमोठी वादळे
घडवून मग ती वादळे पेल्यात
रिचविण्यात अनेकजण धन्यता
मानतात. अशावेळी आजच्या
डिजिटल अभिमुख युगात
वाचकांच्या भेटीला दोन
अनमोल पुस्तके आणून
लोटस पब्लिकेशन ने
साहित्य क्षेत्राकरिता असलेले
त्यांचे ध्येय सिद्ध
केले.
तर त्याचवेळेला डॉ. वसुधा आपटे यांचे "गुन्हेगारांचे कर्दनकाळ न्यायवैद्यक शास्त्र" हे न्यायवैद्यक शास्त्रातील ८६ विविध विषयांचा गोषवारा शास्त्रीय पद्धतीने अतिशय रोचक पद्धतीने वाचकांसमोर आणणारे पुस्तक.
कार्यक्रमाचे स्थळ देखील तितकेच सांस्कृतिक कलेचा वारसा लाभलेले राजा शिवाजी विद्यासंकुलाचे "प्राचार्य बी. एन .वैद्य सभागृह ". कार्यक्रमाला पोहचल्यावर प्रामुख्याने आढळलं ते काही तेजस्वी तरुण मंडळी लोटस पब्लिकेशनचे ओळखपत्र लावून सभागृहात प्रत्येकाशी सविनय वागताना दिसत होती . एखाद्या घरगुती समारंभाला देखील लाजवेल इतकं वैयक्तिक लक्ष प्रत्येक रसिक मान्यवरांना ही मंडळी देत होती. आवर्जून चहा-कॉफीचा आग्रह करीत होती. पुस्तक प्रकाशनचा सोहळा असा देखील असतो यावर विश्वास पटत नव्हता. एरव्ही प्रमुख पाहुण्यांव्यतिरिक्त वैयक्तिक लक्ष आणि सन्मानपूर्वक वागणूक प्रेक्षकांना कदाचित मिळत असेल .म्हणूनच कार्यक्रमात उच्चारलेले "रसिक मान्यवर" हे वाक्य वरवरचे नसून अगदी अंतःकरणापासून होते.
या पब्लिकेशनचा पायाच मुळी
एका ठाम ध्येयावर
आधारित आहे, तो म्हणजे समर्थ
भारत घडविण्यासाठी गरज
असलेल्या सुदृढ लोकशाही
आणि त्याकरिता सुशिक्षित,
बुद्धिमान मध्यमवर्गावर सांस्कृतिक सावधपणाचे
संस्कार करणे. "सांस्कृतिक
सावधपणा" ह्याची असलेली
गरज आजवर किती
जणांनी ओळखली? आणि
जरी ओळखली तर
किती जण त्यासाठी
कार्यरत झाले. पण
इथेच लोटस पब्लिकेशनची
वेगळी आणि विशेष
बाब लक्षात येते.
एकीकडे आशालता ताई वाबगावकरांचे "गर्द सभोवती" हे मानवी संवेदनांना साद घालणारे पुस्तक.कार्यक्रमाचे स्थळ देखील तितकेच सांस्कृतिक कलेचा वारसा लाभलेले राजा शिवाजी विद्यासंकुलाचे "प्राचार्य बी. एन .वैद्य सभागृह ". कार्यक्रमाला पोहचल्यावर प्रामुख्याने आढळलं ते काही तेजस्वी तरुण मंडळी लोटस पब्लिकेशनचे ओळखपत्र लावून सभागृहात प्रत्येकाशी सविनय वागताना दिसत होती . एखाद्या घरगुती समारंभाला देखील लाजवेल इतकं वैयक्तिक लक्ष प्रत्येक रसिक मान्यवरांना ही मंडळी देत होती. आवर्जून चहा-कॉफीचा आग्रह करीत होती. पुस्तक प्रकाशनचा सोहळा असा देखील असतो यावर विश्वास पटत नव्हता. एरव्ही प्रमुख पाहुण्यांव्यतिरिक्त वैयक्तिक लक्ष आणि सन्मानपूर्वक वागणूक प्रेक्षकांना कदाचित मिळत असेल .म्हणूनच कार्यक्रमात उच्चारलेले "रसिक मान्यवर" हे वाक्य वरवरचे नसून अगदी अंतःकरणापासून होते.
ह्यातून एक सारखं
जाणवत होते ते म्हणजे या तरुणांची लोटस पब्लिकेशनच्या
प्रति असलेली बांधिलकी
आणि त्यांच्यावर पब्लिकेशनचे
असलेले संस्कार. एकावेळीच दोन
पुस्तकांचे प्रकाशन असूनसुद्धा कुठेही
कसलीही गडबड, घाई,
गोंधळ जाणवत नव्हता.
किंबहुना सनईच्या सुरांनी अख्ख
सभागृह मंत्रमुग्ध झालं
होते. संपूर्ण कार्यक्रमाला
एक दिशा होती
आणि त्या दिशेचा
संथ प्रवाह वेळोवेळी
इंद्रायणी नदीच्या तीरावर निवांत
बसण्याची अनुभूती देत होता. कार्यक्रमाची
मांडणीच इतकी सुरेख
आणि सुबक होती
की आयोजकांनी वेळेचा
चांगलाच सदुपयोग केलेला
दिसून येत होता.
त्यामुळे कार्यक्रम कुठेच रटाळवाणा
वाटत नव्हता. आशालताताई
आणि डॉ वसुधा
आपटे यांच्या मनोगतातून
लोटस पब्लिकेशन ने
पुस्तक प्रकाशनासाठी केलेल्या
अनन्य साधारण योगदानाची
प्रचिती येत होती.
या सगळ्यावरून एकंदरीत
लोटस पब्लिकेशनचा आवाका
लक्षात येतो.
मानवाच्या शोधबुद्धीचा आत्मप्रकाशाचा वेग
सूर्यप्रकाशाला देखील मागे
टाकू शकतो. हे
जाणून लोटस पब्लिकेशन
ने बारा वर्षांपूर्वी
"दैनिक प्रत्यक्ष" हा एक
वेगळा प्रयोग वाचकांसमोर
मांडला.
या दैनिकाने
बिगर राजकीय अशी
स्वतःची वेगळी ओळख
करून दिली. देश
आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील
महत्त्वाच्या घडामोडींचा वेध घेणाऱ्या
बातम्या या दैनिकात
आहेत. वास्तवाचं भान
करून देणाऱ्या अनेक
उत्कृष्ट लेखमाला वाचकांसमोर मांडल्या.
यातील सर्वात महत्त्वाची
ठरलेली लेखांची मालिका
म्हणजे "तिसरे महायुद्ध
". दैनिक प्रत्यक्ष चे कार्यकारी
संपादक डॉ. अनिरुद्ध
धैर्यधर जोशी यांच्या
लेखणीतून साकारलेली "तिसरे महायुद्ध
" ही लेखमाला पुष्कळ गाजली.
याच्या तीन आवृत्त्या
मराठी, हिंदी आणि
इंग्रजी भाषांतून लोटस
पब्लिकेशनने देशभरातील वाचकांना उपलब्ध
करून दिल्या आहेत.
चालता बोलता इतिहास
या सदरातून झेप
घेत राष्ट्रीय स्वयंसेवक
संघावरील पुस्तकही लोटस पब्लिकेशनने
वाचकांसाठी मराठी, हिंदी,
गुजराती आणि इंग्रजी
अशा चार भाषांतून
एकाच वेळी प्रकाशित
केले.
याशिवाय चालता
बोलता इतिहास या
सदराला अनेक दिग्गज
व्यक्तिमत्त्वाच्या लेखणीने समृद्ध केले.
स्वतःचे कर्तृत्त्व, त्यांचे
विचार त्यांच्याच शब्दात
मांडण्यासाठी लोटस पब्लिकेशनने
अनेक मान्यवरांना आवाहन
केले आणि त्याचा
योग्य तो आदर या सर्व
मान्यवरांनी त्यांच्या लेखमालेतून राखलेला
आढळून येतो. यात
लेखिका श्रीमती पुष्पा
त्रिलोकेकर, सुप्रसिद्ध संगीतकार श्री
प्यारेलाल शर्मा, पटकथाकार
श्री सलीम खान,
रंगभूषाकार श्री पंढरीनाथदादा
जुकर, संगीत रंगभूमी
गाजविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री जयमालाबाई
शिलेदार, शिवाय समाजकारणातील
सिंहाचा वाटा उचलणाऱ्या
श्रीमती मृणालताई गोरे,
सहकार क्षेत्रातील श्री
बाळासाहेब विखे पाटील,
वृत्तपत्रसृष्टीतले दिग्गज श्री
मुरलीधर शिंगोटे यांच्या
समृद्ध लेखणींचा समावेश
आहे.
या लेखमालांना वाचकांचा उदंड
प्रतिसाद मिळत आहे.
या लेखमालांची पुस्तकेही
लवकरच लोटस पब्लिकेशन
वाचकांसमोर आणणार आहेत.
कार्यक्रमाचे
सन्माननीय प्रमुख पाहुणे
लोकप्रिय अभिनेते श्री सचिनजी
खेडेकर आणि मुंबईचे
माजी पोलीस महानिरीक्षक
श्री प्रवीणजी दीक्षित
यांची उपस्थिती पुस्तकांच्या
अनुशंघाने एकदम चपखल
होती. या दोन्ही
मान्यवरांनी अतिशय मार्मिक
विवेचन रसिकांसमोर मांडले.
यातूनच लोटस पब्लिकेशनच्या
प्रगल्भतेची जाणीव झाल्याशिवाय
राहत नाही.
कार्यक्रम झाल्यावर लोटस पब्लिकेशनचे
एम. डी. श्री
समीरसिंह दत्तोपाध्येजी यांना भेटण्याची
संधी मिळाली.
ते
सांगत होते त्यांच्या
पब्लिकेशनचा हेतूच मुळी समाजासाठी जे आवश्यक
आहे तेच, व बदलत्या
काळाचे भान देणारं,
निखळ आणि केवळ
सकारात्मक साहित्य उपलब्ध करून
देणे. नुसतं पुस्तक प्रकाशनापर्यंत
पब्लिकेशनची जबाबदारी नाही तर त्यातून आजच्या पिढीवर
चांगले संस्कार घडविणे,
त्यांनी पुढे सांगितलं
कि ही
दोन्ही पुस्तके खालील संकेतस्थळांवर देखील मागविण्याची सोय
आहे.
"गर्द सभोवती"
"गुन्हेगारांचे कर्दनकाळ न्यायवैद्यक शास्त्र"
सतत जाणवते
की लोटस पब्लिकेशन
आयोजित हा पुस्तक
प्रकाशन सोहळा म्हणजे
एका उत्तुंग ज्ञानपर्वतावरून
कोसळणारा धबधबाच.ज्याप्रमाणे
एक विशाल नदीच्या
सानिध्यात येणारे प्रदेश
सुजलाम सुफलाम होतात
अगदी त्याचप्रकारे लोटस
पब्लिकेशनच्या, सानिध्यात येणारे प्रत्येक
वाचक आणि मुखत्त्वे
लेखक देखील सुजलाम
सुफलाम होताना दिसतात.
Beautifully written Onkar Wadekarji.
ReplyDeleteThnx a lot. The whole programme u have elaborated in clean, clearcut and precise way. I will definitely read these books.
Thank you
DeleteLoved the way you written onkatsinh..Ambandya a lot!
ReplyDeleteअतिशय ओघवती भाषाशैली आणि सटीक विषय मांडणी यामुळे वाचताना प्रत्यक्ष कार्यक्रम पहाण्याची अनुभुती मिळाली.
ReplyDeleteखूप छान मांडणी केली आहे.
ReplyDeleteया मधुन संपूर्ण कार्यक्रमाची माहिती मिळाली.
धन्यवाद
ReplyDelete