Monday, 23 May 2016

सुंदरकांड पठण सोहळा- मे- २०१६

१७ मे ते २१ मे रोजी सुंदरकांड पठण सोहळा संपन्न झाला. २१मे रोजी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी मला या सोहळ्यात एक सेवा मिळाली. "नाम". सोहळ्यात येणाऱ्या श्रद्धावान मित्रांच्या कपाळावर नाम अधोरेखित करण्याची सेवा. एकामागोमाग एक एक श्रद्धावान येतच होते. अनेक प्रकारच्या व्यक्ती विविध ठिकाणांवरून कार्यक्रम स्थळी पोहचत होत्या. मे महिन्याच्या उन्हातानात प्रवास करून जसे ते त्या वास्तूत प्रेवेश करीत होते, त्या क्षणाला अगदी त्याच क्षणाला त्यांचा श्रमपरिहार होताना मी पाहत होतो. स्पीकरची रचना इतकी उत्तम होती की वास्तूतील कुठल्याही भागात तुम्ही असा, सुंदरकांडाचे अम्रुतबोल कानावर पडत होते. सहाजिकच प्रवेशद्वारातून आत आल्यावर एका वेगळ्याच विश्वात आल्याची अनुभूती प्रत्येक व्यक्तीला होत होती. संपूर्ण वातावरणच मुळी मंत्रमुग्ध करणारे होते.

 

मी मोजलं नाही पण कदाचित ५००च्या आसपास श्रद्धावानांच्या कपाळावर नाम अधोरेखित करण्याची संधी मला या सेवेतून मिळाली होती. सुरवातीला मी जरासा चिंतेतच होतो कारण ठरवूनसुद्धा मला नीट चित्र रंगविता येत नाही. दरवेळा रंग भरताना मूळ चित्राच्या बाहेर जातोच. जर नाम काढताना  तो वाकडा तिकडा लागला गेला तरपण वर नमूद केल्याप्रमाणे येणाऱ्या श्रद्धावानांचे भाव इतके दांडगे होते , इतके दृढ होते की नकळतच मला एक जाणीव झाली, आणि मनातल्या मनात मी म्हणू लागलो की "हा सुंदरकांड सोहळा आहे यात सगळ सुंदरच असणार, तू फक्त एक लक्षात घे येणाऱ्या प्रत्येक श्र्द्धावानाला नाम लावताना तुला पण सुंदरतेची अनुभूती मिळाली पाहिजे".

एक वयस्क दांपत्य उलट दिशेने हळूहळू चालत माझ्यापाशी येताना दिसत होते. आजींनी आजोबांना सावरण्यासाठी हलकेच त्यांचा हात पकडला होता. त्या म्हणाल्या "आम्हाला तीन नंबर गेटवरून आत सोडले पण हे कुठे ऐकतात यांना दरवेळी नाम लावूनच घ्यायचा असतो". सुमारे ५० मीटरचे अंतर असावे   नंबर गेटमध्ये, तितके अंतर ते  हळूहळू चालत आले होते. आजींच्या रुस्व्यावर आजोबा मिश्किल हसले आणि धीम्या आवाजात मला म्हणाले " काय आहे ना नाम लावल्याशिवाय पूर्ण झाल्यासारखे वाटतच नाही. काय भाव होता आजोबांचा आणि  त्यांचा हट्ट पुरविणाऱ्या आजींचा.
खर सांगतो एकही नाम वेडा वाकडा लागला नाही, उलट अगदी सुबक सुंदर नाम लागले गेलेत. रामनामाने दगड तरल्याची अनुभूती वेगळी ती काय? जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटत होते.

सलग पाच दिवस चालू असलेल्या सुंदरकांड पठणाची सांगता होत होती. मी द्विधा मनस्थितीत  होतो. एकीकडे मी परमोच्च आंनदाच्या शिखरावर होतो त्यात शेवटचा दिवस ही खंत देखील मनाशी बाळगून होतो. आईच्या गर्भात बाळ खुशाल असते तरी त्याला बाहेर पडणे आवश्यक असते. आपण प्रत्येकजण आईच्या गर्भात राहिलो आहे, वाढलो आहे पण कुणी आपल्याला विचारले की काय रे कसे होते ते दिवस? आपण सांगू शकू का? नाही ना? पण खर सांगूआईच्या गर्भात सुखरूप राहण्याची मजा काय असते ती सुंदरकांड पठणाच्या पाच दिवसात मी अनुभव होतो, आणि मीच का अगदी प्रत्येक श्रद्धावानाचा तोच अनुभव असणार यात तिळमात्र शंका नव्हती, कारण शेजारी उभा असलेल्या माझा श्रद्धावान मित्र देखील त्याच मनस्थितीत होता. त्याचा जीव अगदी हळहळत होता कारण आईच्या गर्भातून बाहेर पडण्याची वेळ जी झाली होती.



 सुंदरकांड पठणाचे आवर्तन सुरु होणारच होते. ढोलकी, पेटी सूर जुळवून घेत होते आणि  इतक्यात  लागी लगन मत तोडना हो s s s s…  हे  भजन कानी पडताच  मनाच्या सगळ्या वृत्ती गळून पडल्या.

लागी लगन मत तोडना, बापू  जी मेरी लागी लगन मत तोडना |
बापू  जी मेरी लागी लगन मत तोडना ||
खेती बोआई मैंने तेरे नाम की, मेरे भरोसे मत छोडना |
बापू  जी मेरी लागी लगन मत तोडना ||
लगन लागी है जबसे तेरी, फिकी लागती है दुनिया सारी I
माया तरफ मत मोडना II
बापू  जी मेरी लागी लगन मत तोडना ||
तूही मेरा सेठ है, तू ही साहूकार है, ब्याज पे ब्याज मत जोड़ना |
बापू  जी मेरी लागी लगन मत तोडना ||
दास की बिनती सून ली जे, हात पकड मत छोडना I
बापू  जी मेरी लागी लगन मत तोडना ||

या भजनाने जीवाची चाललेली घालमेल अगदी शब्दात मांडली आणि अक्षरश: डोळ्यातून त्याला वाट सापडली. आजच्या युगात ही निर्व्याज प्रेमाने श्रद्धावानांसाठी  अविरत झटणाऱ्या संस्थेचा पाइक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी हीच परमेश्वरचरणी प्रार्थना

6 comments:

  1. Speechless divine experience narrated very nicely Onkar. Importance of Nam told by aged couple is really very touchy.

    ReplyDelete
  2. Speechless divine experience narrated very nicely Onkar. Importance of Nam told by aged couple is really very touchy.

    ReplyDelete